सकाळ डिजिटल टीम
'सनम तेरी कसम' चित्रपटाने मावरा हुसेनला बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख दिली. हर्षवर्धन राणेसोबत तिची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली होती.
पाकिस्तानी कलाकारांवर लागू असलेला बंदीचा नियम मावरा हुसेनच्या करिअरला प्रभावित करत आहे.दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांवरील संपूर्ण बंदी हटवली होती.
न्यायालयाने स्पष्ट केलं की कला, संगीत, नृत्य आणि सिनेमा राजकारणाच्या कचाट्यात अडकवू नये.कला आणि सांस्कृतिक संवाद देशांमध्ये बंधनांची तोडणी करू शकतात.
न्यायालयाच्या निर्णयानंतरही बॉलीवूड निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकारांना साइन करण्यास उत्सुकता दाखवलेली नाही.बॉलीवूडमध्ये 'बॉयकॉट' ट्रेंड्सचा परिणाम दिसत आहे.
'सनम तेरी कसम'चा दुसरा भाग लिहून ठेवला होता, पण पहिला भाग बॉक्स ऑफिसवर फसला.आता चित्रपटाला नव्याने यश मिळत असल्याने, दुसऱ्या भागावर काम करण्याची तयारी आहे.
दुसऱ्या भागात मावरा हुसेन असणार का? हे ठरलेलं नाही.पाकिस्तानी कलाकारांना बॉलीवूडमध्ये संधी मिळेल की नाही, हे सस्पेन्स आहे.
भारतीय प्रोड्यूसर्स अजूनही ‘बॉयकॉट बॉलीवूड’सारख्या ट्रेंड्सचा विचार करून निर्णय घेत असल्याचं दिसत आहे.यामुळे पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा बॉलीवूडमध्ये संधी मिळवण्यास अडचणी येत आहेत.