kimaya narayan
अभिनेता अमिताभ बच्चन आज बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. त्याच्या अभिनयाबरोबरच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं.
अमिताभ यांना बॉलिवूडचा महानायक म्हटलं जातं. पण त्यांची प्रेमप्रकरणही खूप गाजली. पण अमिताभ यांच्या पहिल्या प्रेमाविषयी माहितीये का ?
नाही आम्ही रेखाविषयी नाही बोलत आहोत. रेखा अमिताभ यांच्या आयुष्यात खूप नंतर आल्या. पण त्यांचं हे अफ़ेअर खूप गाजलं.
तर बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यावर अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न केलं. पण ते बरीच वर्षं डेट करत होते. पण जया यांच्या आधीही एक तरुणी अमिताभ यांची गर्लफ्रेंड होती.
अमिताभ यांच्या पहिल्या गर्लफ्रेंडचं नाव माया होता. लेखक हनीफ झवेरी यांनी तिचायविषयी सांगितलं. कोलकातामध्ये नोकरीसाठी राहत असताना माया त्यांच्या आयुष्यात आली. ती फ्लाईट अटेंडन्ट होती.
अमिताभ त्यानंतर मुंबईत आले आणि त्यांच्या आईच्या नातेवाईकाच्या घरी राहू लागले. माया तिथेच त्यांना भेटायला यायची पण नंतर आईला अफेअरविषयी समजल्यास अडचण होईल म्हणून त्यांनी ते घर सोडलं.
बिग बींचे सहकलाकार अन्वर अलींना या अफेअरविषयी माहित होतं. माया मॉडर्न असल्यामुळे तेजी बच्चन स्वीकारणार नाहीत असा सल्ला त्यांनी दिला. जो बिग बींना पटला आणि त्यांनी मायाशी नातं तोडलं.
रेखा किंवा जया नाही तर या मुलीच्या प्रेमात ठार वेडे झालेले अमिताभ बच्चन