भगवान शिवाचे प्रतीक असलेल्या त्रिशूळाचा अर्थ काय?

सकाळ डिजिटल टीम

त्रिशूळचा अर्थ

भगवान शिवाच्या हातात असलेले त्रिशूळ हे केवळ एक शस्त्र नाही, तर त्याचे अनेक प्रतीकात्मक आणि आध्यात्मिक अर्थ आसल्याचे सांगीतले जाते. काय आहेत या त्रिशूळचा अर्थ जाणून घ्या.

Trishul | sakal

त्रिगुणांचे प्रतीक

त्रिशूळाची तीन टोके हिंदू धर्मातील तीन मूलभूत गुणांचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते.

सत्त्व (Sattva): चांगुलपणा, ज्ञान, आणि शुद्धता.

रजस् (Rajas): क्रिया, उत्कटता आणि हालचाल.

तमस् (Tamas): निष्क्रियता, अज्ञान आणि अंधकार.

Trishul | sakal

काळांचे प्रतीक

त्रिशूळ हे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीन काळांचे प्रतीक आहे, जे शिवाची काळावर असलेली सत्ता दर्शवते. अशी मान्याता आहे.

Trishul | sakal

कार्यांचे प्रतीक

त्रिशूळ हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या सृष्टी, स्थिती आणि लय या तीन कार्यांचे प्रतीक असल्याचे म्हंटले जाते.

Trishul | sakal

अवस्थांचे प्रतीक

त्रिशूळ हे जागृत अवस्था, स्वप्नावस्था, गाढ निद्रावस्था या मानवी चेतनेच्या तीन अवस्था दर्शवते अशी मान्यता आहे.

Trishul | sakal

त्रिमूर्तीचे प्रतीक

काही ठिकाणी त्रिशूळ हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते, जे संपूर्ण विश्वाचे संचालन करतात. असे म्हंटले जाते.

Trishul | sakal

तिसऱ्या डोळ्याचे प्रतीक

काही प्रतीकात्मक अर्थानुसार, त्रिशूळाचे मधले टोक शिवाच्या तिसऱ्या डोळ्याचे प्रतिनिधित्व करते, जे ज्ञान आणि विवेक दर्शवते.

Trishul | sakal

कैलास पर्वत

हे शस्त्र शिवाच्या निवासस्थानाशी, म्हणजे कैलास पर्वताशी आणि हिमालयाच्या तीन शिखरांशी जोडले गेले आसल्याचे म्हंटले जाते.

Trishul | sakal

नियंत्रणाचे प्रतीक

त्रिशूळ हे मन, वाणी आणि कर्म यांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रतीक मानले जाते. हे तीन गोष्टींवर नियंत्रण ठेवल्यास आध्यात्मिक प्रगती होते, असे मानले जाते.

Trishul | sakal

अंगारकी चतुर्थीला बाप्पाची पूजा कशी कराल?

येथे क्लिक करा