Shubham Banubakode
आपल्याकडे शुभम हे नाव सर्वात कॉमन आहे.
आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबात एकतरी शुभम असतोच असतो.
शुभम नावाच्या मुलाशिवाय तुमच्या मित्र-मैत्रिणींचा गोतावळा अपूर्ण आहे, असं गंमतीने म्हटलं जातं.
मात्र, शुभम या नावाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
चला आज शुभम या नावाचा नेमका अर्थ काय? ते जाणून घेऊया.
शुभम हे मूळ संस्कृत नाव आहे.
शुभम हे नाव पुरुषलिंगी नाव आहे.
शुभम या नावाचा अर्थ महत्त्वकांशी किंवा उज्ज्वल असा होता.
शुभम या नावाचे इतर अर्थ शुभ, भाग्यवान असेही होतात.
विशेष म्हणजे शुभम नावाची मुलं त्यांच्या नावाच्या अर्था प्रमाणेच महत्त्वाकांशी असतात, असं म्हटलं जातं.