सकाळ डिजिटल टीम
‘द कश्मीर फाइल्स’च्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एका सत्यकथेवर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत.
विवेक अग्निहोत्रीचा आगामी चित्रपट ‘द दिल्ली फाइल्स : द बंगाल चॅप्टर’चा टीझर २६ जानेवारीला प्रदर्शित झाला.
टीझरमध्ये ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा पहिला लूक समोर आला असून, त्यांचा प्रखर आणि प्रभावी अंदाज पाहायला मिळत आहे.
‘द दिल्ली फाइल्स’ भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकणार आहे. समाज, राजकारण आणि इतिहास यामध्ये दडलेले प्रश्न या चित्रपटातून मांडले जातील.
या चित्रपटात मिथुन चक्रवर्तींसोबत अनुपम खेर, पल्लवी जोशी, पुनीत इस्सर आणि गोविंद नामदेव यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘द दिल्ली फाइल्स’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर, ‘द दिल्ली फाइल्स’ला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.