सकाळ डिजिटल टीम
फाल्गुनी नायर एक भारतीय अब्जाधीश उद्योजिका असून त्या फेमस Nykaa या प्रमुख सौंदर्य आणि जीवनशैली रिटेल ब्रँडच्या संस्थापक आणि CEO आहेत.फोर्ब्सच्या मते, त्यांची संपत्ती $२.९ बिलियन आहे, ज्यामुळे त्या भारतातील सर्वात श्रीमंत स्वयंनिर्मित महिला आहेत.
राधा वेम्बू एक भारतीय अब्जाधीश महिला व्यवसायिक आहेत आणि Zoho Corporation या प्रमुख सॉफ्टवेअर कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. मार्च २०२५ पर्यंत, त्यांची संपत्ती $३.२ बिलियन आहे, ज्यामुळे त्या भारतातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत स्वयंनिर्मित महिला आहेत.
जयश्री उळाल एक भारतीय-अमेरिकन अब्जाधीश महिला व्यवसायिक आहेत आणि Arista Networks या प्रमुख क्लाऊड नेटवर्किंग कंपनीच्या अध्यक्ष आणि CEO आहेत. त्यांचे अंदाजे संपत्ती $४.२ बिलियन आहे.
किरण मजुमदार शॉ, Biocon या कंपनीच्या संस्थापक आहेत आणि एक प्रसिद्ध भारतीय अब्जाधीश उद्योजिका आहेत. फोर्ब्सच्या मते, त्यांचे निव्वळ संपत्ती अंदाजे $३.१ बिलियन आहे.
नेहा नारखेड़े एक भारतीय-अमेरिकन उद्योजिका आहेत आणि Confluent या डेटा स्ट्रीमिंग तंत्रज्ञान कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. फोर्ब्सच्या मते, त्यांची संपत्ती अंदाजे $६८० मिलियन आहे.
इंद्रा के नोयी एक भारतीय-अमेरिकन व्यवसाय नेत्य आहेत, ज्यांनी PepsiCo च्या CEO म्हणून २००६ ते २०१८ पर्यंत कार्य केले आणि कंपनीच्या विविधतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांची अंदाजे संपत्ती $३४० मिलियन आहे.
कविता सुब्रमण्यम, Upstox या भारतातील सर्वात वेगाने वाढणार्या गुंतवणूक प्लॅटफॉर्मच्या सह-संस्थापक आहेत आणि त्यांचे अंदाजे संपत्ती $३०९.०१५ मिलियन आहे.
देविता सराफ एक भारतीय उद्योजिका आहेत आणि Vu Televisions या कंपनीच्या संस्थापक, अध्यक्ष आणि CEO आहेत. त्यांची अंदाजे संपत्ती $२०६.३९ मिलियन आहे.