Apurva Kulkarni
लक्ष्मी निवास मालिकेतील जयंत म्हणजे अभिनेता मेघन जाधव सध्या घराघरात पोहचला आहे.
नुकतच मेघनने 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या फिटनेसबाबत सांगितलं आहे.
फिट राहण्यासाठी तो काय काय करतो? याबद्दल त्याने चाहत्यांना सांगितलं आहे.
मेघन म्हणाला की, 'माझी विशिष्ट अशी दिनचर्या नाही. शुटिंगच्या दिवशीही मी तीन तीन पर्यंत जागा असतो.'
'परंतु आयुष्यात मी एक मंत्रा ठेवला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मी एक लिमिट ठेवली आहे.'
'मी घरचंच जेवण खातो. पण बाहेरच खाल्लं तरी मी लिमिटमध्ये खातो. कारण लिमिटमध्ये खाल्लं मी माणूस बॅलेन्स राहतो.'
पुढे बोलताना मेघन म्हणाला की, 'माझ्या दिनचर्येत व्यायाम हा महत्त्वाचा भाग आहे. मी सध्या व्यायामामध्येही बदल केलेत.'
मेघन सध्या लक्ष्मी निवास मालिकेमुळे घराघरात पोहचला आहे.