Puja Bonkile
सणासुदीत मेहंदी काढायला अनेक महिलांना आवडते.
मेहंदी काढणे याला खास महत्व आहे. अनेक महिला हजारो रूपये खर्च करून मेहंदी काढतात.
तुम्ही दिवाळीत मेहंदी लावण्याचा विचार करत असाल तर कमी खर्चात सुंदर डिझाइन काढू शकता.
मेहंदी काढण्यासाठी तुम्हाला १, १०, २ चे नाणं घ्यावे लागेल.
हातावर चार नाणी थोडे अंतर ठेऊन ठेवा.
नाण्यांभोवती मेहंदीचे ठिपके काढावे. नंतर नाणे काढून टाका.
नंतर इअरबड्च्या मदतीने आतील बाजून पसरवा. ज्यामुळे फुलांचा आकार येईल. मधोमध ठिपके काढा.