महाबळेश्वर विसरा! महाभारतातील भूमीत थंडहवेचा आनंद घेण्यासाठी जवळचं गुपित

Aarti Badade

विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण

सर्वाधिक उष्णतेची शहरे असणाऱ्या विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणजे चिखलदरा. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १११८ मीटर उंचीवर वसलेले आहे.

Chikhaldara Tourism

|

Sakal

ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्व

महाभारत महाकाव्यात चिखलदऱ्याचा उल्लेख आढळतो. पौराणिक कथांनुसार, भीमाने कीचकाला ठार मारून या खोऱ्यात फेकले, ज्यामुळे याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

Chikhaldara Tourism

|

Sakal

कॉफी उत्पादक क्षेत्र

तुम्ही चिखलदरा येथे पाऊल टाकताच, हवेतील कॉफीचा गंध तुम्हाला भारावून टाकेल. हा प्रदेशातील एकमेव कॉफी उत्पादक क्षेत्र आहे.

Sakal

साहसी अनुभव मेळघाट व्याघ्र प्रकल्प

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर स्थित चिखलदरा विविध प्राणी आणि वनस्पतींनी समृद्ध आहे. येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना साहसी सफारीचा अविस्मरणीय अनुभव देतो.

Sakal

चिखलदऱ्यातील खास ठिकाणे

चिखलदरा भेटीत भीमकुंड दर्शन, प्राचीन ग्वालीगड किल्ल्याची भ्रमंती आणि मुक्तागिरी मंदिरात दर्शन घेण्याचा अनुभव नक्की घ्या.

Sakal

जवळील प्रेक्षणीय स्थळे

जवळील नरनाळा किल्ला, आमनेरचा किल्ला आणि गुगुमल राष्ट्रीय उद्यान यांसारख्या सभोवतालच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन तुमच्या सफारीचा आनंद वाढवा.

Sakal

कसे पोहोचाल

अमरावती रेल्वे स्थानकातून (१०० किमी) बस किंवा टॅक्सीने चिखलदऱ्याला पोहोचता येते.

sakal

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ

ऑक्टोबर ते मे दरम्यान सहल आयोजित करा, कारण या काळात हवामान आल्हाददायक असते.

Sakal

रोजची कटकट, बॉसची बडबड... थोडं थांबा, हा घाट तुमचं मन शांत करेल!

Tamhini Ghat Tourism

|

Sakal

येथे क्लिक करा