मेळघाटातून उडालं अन् थेट राजस्थानात पोहोचलं! 27 दिवसांत 3,334 किमीचा प्रवास करणारा हा पक्षी कोण?

Vinod Dengale

गिधाडाची भरारी

महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून मुक्त केलेल्या एका गिधाडाने तब्बल 3,334 किलोमीटर अंतर पार करत राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्प गाठला.

27 दिवसांत 3,334 किमी

हे गिधाड 28 मे रोजी मेळघाटातून निघाले आणि केवळ 27 दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान असा लांबचा प्रवास पूर्ण केला.

कुठे थांबलं?

प्रवासादरम्यान गिधाडाने सातपुडा व्याघ्र प्रकल्प, भोपाळ परिसर आणि कुनो राष्ट्रीय उद्यानात मुक्काम केला.

कोण आहे हे 'सुपर ट्रॅव्हलर'?

या गिधाडाचे नाव 'X67' असून ते 5 वर्षांचे मादी गिधाड आहे. जानेवारीमध्ये मेळघाटातून सोडलेल्या 15 गिधाडांपैकी हे एक आहे.

GPS ट्रॅकिंग

X67 सह सर्व गिधाडांना सोलर GPS ट्रॅकिंग टॅग लावण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर वैज्ञानिकांचे लक्ष आहे.

विशेष बाब

हे गिधाड संपूर्ण प्रवासात कोणत्याही अतिरिक्त अन्नाशिवाय नैसर्गिक अधिवासात टिकून राहिले आणि स्वतःचे अन्न शोधत राहिले.

वैज्ञानिकांसाठी मोठे यश

पिंजऱ्यात वाढलेली गिधाडे जंगलात टिकू शकतात, अन्न शोधू शकतात आणि हजारो किलोमीटर उडू शकतात, हे या प्रवासाने सिद्ध केले.

निळी कडी

गिधाडांच्या पायात लावलेली निळ्या रंगाची कडी हे गिधाड भारतातील असल्याचे दर्शवते. त्यावरील 'M' हे महाराष्ट्राचे प्रतीक आहे.

महाराष्ट्रातील पहिले खाटू श्याम मंदिर, काय आहे रहस्य?

Maharashtra's First Khatu Shyam Temple: A New Hub of Faith and Devotion

|

esakal

हेही वाचा