Monika Shinde
स्मरणशक्ती मजबूत ठेवणे ही फक्त वृद्धावस्थेत नव्हे तर कोणत्याही वयात महत्त्वाची आहे. योग्य सवयी अंगीकारल्यास मेंदू तजेलदार आणि मन प्रसन्न राहते.
Memory Improvement Tips
Esakal
शारीरिक हालचाल केल्यास मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो, न्यूरॉन्स सक्रिय राहतात आणि स्मरणशक्ती सुधारते. चालणे, धावणे, योग किंवा हलका व्यायाम फायदेशीर ठरतो.
Memory Improvement Tips
Esakal
फळे, भाज्या, फिश ऑइल, अक्रोड, बदाम यांसारखा आहार मेंदूला ताकद देतो. योग्य आहाराने स्मृती मजबूत राहते आणि मेंदू दीर्घकाळ ताजेतवाने राहतो.
Memory Improvement Tips
Esakal
झोपेत मेंदू माहिती प्रक्रिया करतो. लहान-लहान गोष्टी लांबकालीन स्मृतीमध्ये रूपांतरित होतात. दररोज पुरेशी झोप घेतल्यास स्मरणशक्ती सुधारते.
Memory Improvement Tips
Esakal
नवीन कौशल्ये शिका, पुस्तकं वाचा, पझल्स सोडवा. सतत मेंदूला काम देत राहिल्यास स्मृती टिकते आणि मेंदू सक्रिय राहतो.
Memory Improvement Tips
Esakal
दीर्घकालीन ताण मेंदूच्या स्मृती केंद्रावर परिणाम करतो. ध्यान, योग, श्वासोच्छवासाचे व्यायाम यांसारख्या तंत्रांचा वापर करून ताण नियंत्रित करा.
Memory Improvement Tips
Esakal
मित्र, कुटुंब आणि समाजासोबत संवाद साधणे मेंदूला व्यायाम देते. गप्पा, गट उपक्रम, मैत्रीपूर्ण चर्चेने स्मृती सुधारते.
Memory Improvement Tips
Esakal
गोंधळलेले वातावरण आणि व्यस्त वेळापत्रक मेंदू ओव्हरलोड करतात. त्यामुळे नोट्स, लिस्ट, रंगीबेरंगी टिप्स वापरल्यास माहिती सहज लक्षात राहते.
Memory Improvement Tips
Esakal