Aarti Badade
स्तनाचा कर्करोगकेवळ स्त्रियांना होतो, हा एक मोठा गैरसमज आहे. पुरुषांच्या शरीरातही निप्पलच्या आसपास 'ब्रेस्ट टिश्यू' असतात, ज्यामुळे त्यांनाही या कर्करोगाचा धोका असतो.
Male Breast Cancer Awareness
Sakal
शरीरातील इस्ट्रोजेन संप्रेरकाची (Hormone) पातळी वाढणे, लठ्ठपणा, अनुवांशिकता आणि अंडकोषांचे आजार ही पुरुषांमधील ब्रेस्ट कॅन्सरची मुख्य कारणे मानली जातात.
Male Breast Cancer Awareness
Sakal
निप्पलच्या मागे वेदनाहीन गाठ येणे किंवा निप्पल आतल्या बाजूला ओढले जाणे हे प्राथमिक लक्षण आहे. अनेकदा वेदना होत नसल्याने पुरुष याकडे दुर्लक्ष करतात, जे घातक ठरू शकते.
Male Breast Cancer Awareness
Sakal
स्तनावरची त्वचा अचानक जाड होणे, त्वचेवर खड्डे पडणे किंवा सतत लालसरपणा जाणवणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. अशा बदलांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
Male Breast Cancer Awareness
Sakal
कर्करोगाचा प्रसार झाल्यास लिम्फ नोड्सवर परिणाम होतो. त्यामुळे काखेमध्ये किंवा कॉलरबोनच्या आसपास गाठ किंवा सूज आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Male Breast Cancer Awareness
Sakal
आजार बळावल्यास निप्पल मधून रक्त किंवा पाणी येणे, तसेच तिथे न भरणारी जखम होणे अशी लक्षणे दिसतात. हे आजार गंभीर अवस्थेत असल्याचे संकेत आहेत.
Male Breast Cancer Awareness
Sakal
या कर्करोगाच्या निदानासाठी मॅमोग्राफी, अल्ट्रासाऊंड आणि बायोप्सी केल्या जातात. शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि कीमोथेरपीद्वारे यावर उपचार करणे शक्य आहे.
Male Breast Cancer Awareness
Sakal
Stomach heat relief remedies
Sakal