सकाळ डिजिटल टीम
जगभरात अनेक गंभीर आजार असे आहेत, जे महिलांपेक्षा पुरुषांना जास्त प्रमाणात होतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे पुरुषांचे आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. चला, पुरुषांना अधिक त्रास देणाऱ्या ५ प्रमुख आजारांविषयी जाणून घेऊया..
Men Health Risks
esakal
६० वर्षांनंतर पुरुषांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. तणाव, जंक फूडचे सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही यामागील प्रमुख कारणे आहेत. वेळोवेळी तपासणी आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे.
Men Health Risks
esakal
हा आजार फक्त पुरुषांमध्येच आढळतो. ४५ वर्षांनंतर त्याचा धोका वाढतो. वारंवार लघवी होणे किंवा मूत्रविकाराची समस्या दिसून येणे ही लक्षणे असू शकतात. नियमित तपासणी व जीवनशैलीत बदल करून हा धोका कमी करता येतो.
Men Health Risks
esakal
पुरुषांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग जास्त प्रमाणात दिसतो, कारण धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन हे पुरुषांमध्ये अधिक आढळते. हे टाळण्यासाठी धूम्रपान व तंबाखूचे सेवन पूर्णपणे थांबवणे आवश्यक आहे.
Men Health Risks
esakal
महिलांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो. ताणतणाव, धूम्रपान, लठ्ठपणा आणि उच्च रक्तातील साखर ही यामागची प्रमुख कारणे आहेत. ताण नियंत्रण आणि नियमित तपासणी यामुळे हा धोका कमी करता येतो.
Men Health Risks
esakal
महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये तोंडाचा कर्करोग दुप्पट प्रमाणात आढळतो. यामागचे कारण गुटखा, पान, तंबाखू आणि इतर व्यसनाधीन पदार्थ आहेत. यापासून तात्काळ दूर राहणेच या आजारावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे.
Men Health Risks
esakal
महिला त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक असतात, परंतु पुरुष अनेकदा लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे आजार गंभीर होऊन परिस्थिती बिकट बनते.
Men Health Risks
esakal
नियमित व्यायाम करा
संतुलित व पौष्टिक आहार घ्या
तणाव टाळा
धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहा
नियमित आरोग्य तपासणी करा
मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या
Men Health Risks
esakal
Turmeric Side Effects
esakal