सततचा ताण आणि मानसिक थकवा जाणवतोय? रोजच्या आयुष्यात ‘हे’ बदल करा

Varsha Balhe

बदल

दिवसभराचं काम, घरची जबाबदारी आणि सतत मोबाईलमध्ये गुंतून राहणं या सगळ्यामुळे शरीरापेक्षा मन जास्त थकू शकतं. हा मानसिक थकवा कमी करण्यासाठी रोजच्या सवयी थोड्या बदलून पाहा.

STRESS RELIEF

|

esakal

दिवसाची सुरुवात

सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याची सवय थोडी बाजूला ठेवा. काही मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त श्वासावर लक्ष द्या.

STRESS RELIEF

ब्रेक

सतत येणारे मेसेज, कॉल आणि सोशल मीडिया अपडेट्समुळे मनाला शांत बसायलाच वेळ मिळत नाही. दिवसातून ठराविक वेळ फोन बाजूला ठेवण्याची सवय लावा.

STRESS RELIEF

|

esakal

झोपेची वेळ सांभाळा

रात्री उशिरापर्यंत जागून दुसऱ्या दिवशी थकवा घेऊन उठण्यापेक्षा झोपेची वेळ नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा. शांत आणि आरामदायी वातावरणात पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे.

STRESS RELIEF

|

esakal

मूड

व्यायामासाठी रोज जिममध्ये जाण्याची गरज नाही. थोडं चालणं, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायामही दिवसातून काही वेळ केल्यास शरीर आणि मन दोघांनाही ब्रेक मिळतो.

STRESS RELIEF

|

esakal

जबाबदारी

सगळ्यांना खूश करण्याच्या नादात आपण स्वतःवरच खूप दबाव घेतो. गरज असेल तेव्हा ‘नाही’ म्हणायला शिका आणि दिवसभरातून थोडा वेळ फक्त स्वतःसाठी ठेवा.

STRESS RELIEF

|

esakal

काम

गाणं ऐका, पुस्तक वाचा, बागेत वेळ घालवा किंवा तुमचा आवडता छंद जोपासा. दररोजची १५-२० मिनिटं अशी स्वतःसाठी राखून ठेवली तरी मनाला हलकं वाटू शकतं.

STRESS RELIEF

|

esakal

लक्ष

दिवसभर कमी पाणी पिण्याची सवयही थकवा वाढवू शकते. त्यामुळे पुरेसं पाणी प्या आणि रोजच्या आहारात फळं, भाज्या, पालेभाज्या आणि सुकामेवा यांचा समावेश करा.

STRESS RELIEF

|

esakal

दुर्लक्ष नको

कधीमधी मानसिक थकवा जाणवणं सामान्य असू शकतं. पण सतत थकवा, चिडचिड, झोपेचा त्रास किंवा एकाग्रता कमी होण्यासारख्या समस्या जाणवत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.

STRESS RELIEF

|

esakal

मासे पाण्यात झोपतात तरी कसे?

HOW DO FISH SLEEP IN WATER

|

esakal

येथे क्लिक करा