कशातच लक्ष लागत नाही? मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

सतत एकटेपणा जाणवतोय?

कशातच लक्ष लागत नसेल, सतत भीती वाटत असेल किंवा मन उदास राहत असेल, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

mental health | sakal

मानसिक आरोग्याच्या समस्या का वाढत आहेत?

अभ्यास, करिअर, लग्न, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नात्यांमधील मतभेद यांमुळे अनेकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो.

mental health | sakal

नैराश्य आणि चिंतेमागची कारणं काय?

सततचा ताण, एकटेपणा, नात्यांमधील संघर्ष यांसोबतच आनुवंशिकता आणि मेंदूशी संबंधित जैविक घटकही कारणीभूत ठरू शकतात.

mental health | sakal

'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

कशातच लक्ष न लागणे, सतत चिंता किंवा भीती वाटणे, एकटेपणा जाणवणे आणि जगण्याची इच्छा कमी होणे ही गंभीर संकेत असू शकतात.

mental health

|

Sakal

डॉक्टरांकडे जाणं टाळू नका!

मानसिक त्रासाबाबत असलेले गैरसमज आणि औषधांची भीती यामुळे अनेक जण उपचार घेण्यास टाळाटाळ करतात, मात्र वेळेत मदत घेणं महत्त्वाचं आहे.

mental health | sakal

औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का?

प्रत्येक रुग्णाला आयुष्यभर औषधं घ्यावी लागतातच असं नाही, कारण उपचारांचा कालावधी आजाराचं स्वरूप आणि व्यक्तीच्या स्थितीवर अवलंबून असतो.

mental health

|

Sakal

मानसिक आरोग्याची काळजी घ्या!

नैराश्य किंवा चिंतेची लक्षणं जाणवल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि स्वतःला इजा करण्याचे विचार येत असल्यास तातडीने मदत मिळवा.

mental health | sakal

वरळी किल्ला नेमका कुठे आहे? जाणून घ्या इतिहास आणि पोहोचण्याचा मार्ग!

Worli Fort Mumbai

|

Sakal

येथे क्लिक करा