Shubham Banubakode
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे.
या आरोपानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दरम्यान, निलम गोऱ्हेंनी ज्या गाडीचा उल्लेख केला त्या मर्सिडीजची किंमत किती? तुम्हाला माहिती का?
मर्सिडीज बेंझ या जर्मन लक्झरी कार कंपनीसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे,
भारतात दरवर्षी हजारो मर्सिडीज कार विकल्या जातात.
मर्सिडीज-बेंझ कारची एक्स-शोरूम किंमत जवळपास ५० लाखांपासून सुरु होते. तर टॉप मॉडेल ४ कोटींपर्यंत आहे.
मर्सिडीज-बेंझ जीएलए - ५० ते ५५ लाख
मर्सिडीज-बेंझ जीएलएस - १. ३४ कोटी ते १.३९ कोटी
मर्सिडीज-बेंझ मेबॅक जीएलएस - ३.३५ कोटी ते ३,७१ कोटी
मर्सिडीज-बेंझ सी क्लास - ५९ लाख ते ६६ लाख
मर्सिडीज-बेंझ एस क्लास - १.७९ कोटी ते १.९० कोटी
मर्सिडीज-बेंझ ई क्लास - ७८,५० लाख ते ९२.५० लाख
मर्सिडीज-बेंझ जीएलसी - ७६.८० लाख ते ७७.८० लाख
मर्सिडीज-बेंझ ईक्यूएस एसयूव्ही - १.२८ कोटी ते १.४३ कोटी
मर्सिडीज-बेंझ जी क्लास - २.५५ कोटी ते ४ कोटी
मर्सिडीज-बेंझ ईक्यूबी ७२.२० लाख ते ७८.९० लाख
मर्सिडीज-बेंझ जीएलई - ९९ लाख ते १.७७ कोटी
मर्सिडीज-बेंझ एमजी एसएस - २.४७ कोटी
मर्सिडीज-बेंझ इक्यूएस - १.६३ कोटी
मर्सिडीज-बेंझ ईक्यूई एसयूव्ही - १,४१ कोटी