Monika Shinde
मर्चंट नेव्ही हे उच्च पगार मिळवून देणाऱ्या करिअरपैकी एक मानलं जातं
मर्चंट नेव्हीत प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने १२वी सायन्स शाखेतून (फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा
मर्चंट नेव्हीत प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराचं वय किमान 17 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असणं आवश्यक आहे. यासोबतच वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचं प्रमाणपत्र (फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट) सुद्धा आवश्यक असतं.
मर्चंट नेव्हीत प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवाराने एक प्रवेश परीक्षा (Entrance Exam) उत्तीर्ण करणे आवश्यक असते. या परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी भाषा आणि लॉजिकल रिझनिंगशी संबंधित प्रश्न विचारले जातात.
प्रवेश परीक्षा पास झाल्यावर, काउन्सिलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार कॉलेजची निवड करून दिली जाते.
मर्चंट नेव्ही ऑफिसर होण्यासाठी, उमेदवार नॉटिकल साइंस, बीएससी इन नॉटिकल सायन्स किंवा मरीन इंजिनिअरिंगमध्ये बीटेक किंवा संबंधित कोर्सेस पूर्ण करू शकतात
सुरुवातीला मर्चंट नेव्हीमध्ये 60,000 ते 80,000 रुपये पगार मिळतो. डेक ऑफिसर बनल्यानंतर, पगार 1.5 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
प्रमोशन झाल्यावर, सीनियर पदावर काम करत असताना पगार महिन्याला 5 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.