Vinod Dengale
फिफा वर्ल्डकप 2026 ला लवकरच सुरुवात होणार असून यात यंदा 48 संघ जेतेपदासाठी मैदानात उतरतील.
यात मेस्सी आणि रोनाल्डो फुटबॉलचे सर्वात मोठे स्टार खेळणार असल्यामुळे वर्ल्डकपमध्ये दोघांचा सामना कधी होईल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
मेस्सीचा अर्जेंटिना आणि रोनाल्डोचा पोर्तुगाल हे संघ वेगवेगळ्या गटात असल्याने साखळी फेरीत सामना होणार नाही.
साखळी फेरीत नाही पण जर दोन्ही संघांनी गटात अव्वल स्थान मिळवल्यास 11 जुलै रोजी रोनाल्डो विरुद्ध मेस्सी सामना बघायला मिळू शकतो.
गेल्या दोन दशकांपासून मेस्सी आणि रोनाल्डो यांची स्पर्धा जगभर चर्चेत आहे.
फिफा वर्ल्डकप 2026 ही स्पर्धा मेस्सी आणि रोनाल्डो यांचा सहावा वर्ल्डकप ठरू शकते.
वाढत्या वयामुळे हा दोघांचाही अखेरचा वर्ल्डकप असून 11 जुलै रोजी कदाचित शेवटचा सामना असू शकतो.
UPI Rules Changed from June 1! this Settings Every User Must Turn On Right Now
eSakal