Aarti Badade
मेथी-चिकन: एक भन्नाट कॉम्बिनेशन! घरच्या घरी झणझणीत आणि पौष्टिक डिश बनवा!
मेथीच्या भाजीची सुकी पाने,चिकनचे लहान तुकडे,बारीक चिरलेला कांदा,आलं-लसूण वाटण
दही,लाल तिखट,मीठ,गरम मसाला पावडर,तेल
मेथीची पाने स्वच्छ धुवून बाजूला ठेवा.
चिकनमध्ये आलं-लसूण वाटण, दही, तिखट आणि मीठ घालून मुरत ठेवा. किमान ३० मिनिटे मुरवणे आवश्यक आहे.
तेल गरम करून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
परतलेल्या कांद्यात गरम मसाला आणि मेथीची पाने घालून चांगले परतून घ्या.
आता मुरलेले चिकन कढईत घाला आणि ५-१० मिनिटे चांगले परता.
चिकनमधून पाणी सुटेपर्यंत झाकण ठेवून शिजवा. पाणी आटल्यावर, कोरडे होईपर्यंत मंद आचेवर शिजवत रहा.
तुमचे गरमागरम मेथी-चिकन फुलक्यांबरोबर सर्व्ह करा!