मायग्रेनचा त्रास? 'या' छोट्याश्या गोळीने झटक्यात मिळवा आराम!

Monika Shinde

मायग्रेनचा त्रास

मायग्रेनचा त्रास वाढला आहे का? डोकेदुखी, उलट्या आणि प्रकाश संवेदनशीलता यामुळे जीवन खूप त्रासदायक होऊ शकते. आता आराम मिळवण्याचा सोपा मार्ग उपलब्ध आहे.

फायझर

फायझरने भारतात मायग्रेनसाठी रिमेगपेंट ODT लाँच केली आहे. ही गोळी पाण्याशिवाय तोंडात विरघळते, त्यामुळे वेदना झटक्यात कमी होतात आणि आराम मिळतो.

औषध

रिमेगपेंट ही CGRP रिसेप्टर अँटॅगोनिस्ट औषध आहे. मायग्रेनच्या वेदनांचा मुख्य कारणीभूत घटक असलेल्या प्रोटीनवर काम करून वेदना कमी करते आणि रुग्णाला आराम देते.

गोळी

गोळी सध्या ७५ मिलीग्रॅम डोसमध्ये उपलब्ध आहे. ती जेवणाआधी किंवा नंतर घेतली जाऊ शकते. झटपट प्रभावामुळे रुग्ण लगेच कामावर परत येऊ शकतात.

मायग्रेनच्या वेदना कमी करते

DCGI ने रिमेगपेंटला मान्यता दिली आहे. ट्रिप्टन औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या प्रौढांमध्ये मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी ही गोळी वापरता येते.

४८ तासांपर्यंत आराम मिळतो

रिमेगपेंट घेतल्यानंतर ४८ तासांपर्यंत आराम मिळतो. औषधाचा ओव्हरयूज हेडेक होत नाही. वेदना कमी झाल्यानंतर रुग्ण लगेच दैनिक कामावर परतू शकतो.

अनेकांना मायग्रेनचा त्रास आहे

भारतामध्ये अंदाजे २१३ दशलक्ष लोकांना मायग्रेनचा त्रास आहे. दरवर्षी सुमारे १७३ दिवस उत्पादनक्षमतेत नुकसान होते. रिमेगपेंट या समस्येवर प्रभावी उपाय ठरते.

सतत पाईल्सचा त्रास होत असल्यास रोज कोणते फळं खावे?

येथे क्लिक करा