सतत पाईल्सचा त्रास होत असल्यास रोज कोणते फळं खावे?

Monika Shinde

पाईल्स

सतत पाईल्सचा त्रास होत असेल, तर आहारात फायबरयुक्त फळांचा समावेश खूप महत्त्वाचा आहे. योग्य फळे घेतल्याने पोट मोकळे राहते आणि सूज व वेदना कमी होण्यास मदत होते.

पपई

पपईमध्ये भरपूर फायबर व पचक एन्झाइम असतात. रोज सकाळी पपई खाल्ल्याने मल मऊ राहतो, बद्धकोष्ठता कमी होते आणि पाईल्समुळे होणारा त्रास नैसर्गिकरित्या कमी होतो.

केळी

केळीत नैसर्गिक फायबर आणि पोटॅशियम भरपूर असते. रोज एक ते दोन केळी खाल्ल्याने पचन सुधारते, मल नरम राहतो आणि शौचाला बसल्यावर ताण कमी पडतो.

सफरचंद

सफरचंदाच्या सालीत सोल्युबल फायबर जास्त असते. रोज एक सफरचंद खाल्ल्याने आतड्यांची हालचाल सुरळीत राहते, बद्धकोष्ठता कमी होते आणि पाईल्सचा त्रास कमी जाणवतो.

अंजीर

कोरडे किंवा ताजे अंजीर दोन्ही फायदेशीर आहेत. भिजवलेले अंजीर सकाळी खाल्ल्याने आतड्यांची हालचाल वाढते, मल मऊ होतो आणि पाईल्सचा त्रास कमी जाणवतो.

द्राक्षे

द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि भरपूर पाणी असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते, पोट साफ होण्यास मदत होते आणि जळजळ कमी होतो.

किवी

किवीमध्ये अॅक्टिनीदिन नावाचा पाचक एन्झाइम असतो. हे फळ पचन सुधारते, फायबर पुरवते आणि सतत पाईल्स होणाऱ्यांना नैसर्गिकरित्या आराम देते. रोज एक किवी उपयुक्त ठरते.

थंडी वाढतेय आणि सांधेदुखीही? जाणून घ्या यामागचं खरे कारण

येथे क्लिक करा...