kimaya narayan
सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक मिका सिंह कायमच त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. नुकतंच त्याने अभिनेत्री बिपाशा बसूवर टीका केली.
गेला बराच काळ बिपाशा सिनेविश्वापासून लांब आहे. तिने एकही सिनेमात काम केलं नाहीये. यावरूनही मिकाने तिच्यावर टीका केली.
मिकाने नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याच्या आणि बिपाशामधील वादावर भाष्य केलं. बिपाशा आणि करणमुळे त्याचं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप त्याने केला.
“तुम्हाला काय वाटतं? तिला काम का मिळत नसेल? देव सगळं बघतोय” असं त्याने म्हटलं. तर त्याला डेंजरस हा सिनेमा करण आणि नवोदित अभिनेत्रीला घेऊन बनवायचा होता पण मध्येच बिपाशा त्या सिनेमात आली त्यामुळे सिनेमाचं बजेट वाढलं असं त्याने म्हटलं.
त्याचं बजेट चार कोटींचं होतं जे बिपाशाच्या येण्याने चौदा कोटींवर गेलं. शूटिंग दरम्यान बिपाशाच्या मागण्यांमुळे प्रॉडक्शनमध्ये आल्याचा मिकाला पश्चाताप झाला.
करण आणि बिपाशाने लग्न झालेले असूनही वेगवेगळ्या खोल्या राहण्यासाठी मागितल्या. नंतर त्यांनी दुसऱ्या हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यास सांगितली. इतकंच नाही खोटं कारण सांगून किसिंग सीन करण्यास नकार दिल्याचं मिकाने म्हटलं.
हे कलाकार मोठ्या निर्मात्यांच्या कामासाठी पाया पडतात पण छोट्या निर्मात्यांची जे त्यांना पैसे देतात त्यांची यांना कदर नाही असं मिकाने म्हटलं.