सकाळ डिजिटल टीम
अभिनेता मिलिंद गवळी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारणारे मिलिंद गवळी आता 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत यशवंतराव भोसलेची दमदार भूमिका करणार आहेत.
काही महिन्यांचा ब्रेक घेऊन मिलिंद गवळी पुन्हा सेटवर परतले असून, या नव्या भूमिकेसाठी ते उत्सुक आहेत.
"अनिरुद्ध या पात्रावर प्रेक्षकांनी प्रेम केलं, पण आता मी वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत दिसणार आहे," असे मिलिंद गवळी म्हणाले.
यशवंतराव भोसलेची भूमिका त्यांचे खास मित्र, निर्माते शशांक सोळंकी यांच्या मालिकेत असल्याने मिलिंद गवळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.
मिलिंद गवळी आणि शशांक सोळंकी यांची कॉलेजपासूनची मैत्री असून, मित्राच्या शोमध्ये अशी भूमिका साकारणं त्यांच्यासाठी खास आहे.
सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत पार्थ आणि नंदिनीच्या लग्नाच्या तयारीत यशवंतराव भोसलेच्या एंट्रीमुळे मोठा ट्विस्ट येणार आहे.