सकाळ डिजिटल टीम
शाहरुख खान लवकरच 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असून, त्याची मुलगी सुहाना खान या चित्रपटातून थिएट्रिकल डेब्यू करणार आहे.
'किंग' चित्रपटामुळे शाहरुख आणि सुहाना यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
'कॅप्टन अमेरिका' फेम एंथनी मॅकीने शाहरुख खानला ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मध्ये घ्यायचं असल्याचं सांगितलं.
एंथनी मॅकीने म्हटले, "शाहरुख खानच सर्वांत योग्य आहे." त्याने विचारलेला प्रश्न म्हणजे, कोणाला ‘मार्व्हल’मध्ये घ्यायचं?
मॅकीच्या या विधानामुळे चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे, की शाहरुखला ‘मार्व्हल’मध्ये प्रवेश मिळेल का?
शाहरुख खानने एका मुलाखतीत सांगितलं की, त्याला 'अवेंजर्स'मध्ये ऑफर आली होती, पण सलमान खानमुळे तो ते स्वीकारू शकला नाही.
शाहरुख खानच्या हॉलीवूडमध्ये असलेल्या सन्मानावरून स्पष्ट आहे की, त्याला मोठ्या प्रकल्पांत काम करण्याची संधी मिळू शकते.