दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने काय होते? आयुर्वेदानुसार मोठा धोका

संतोष कानडे

आयुर्वेद

आयुर्वेदानुसार दूध आणि केळी एकत्र खाणे हे 'विरुद्ध आहार' मानले जाते, ज्यामुळे शरीराचा समतोल बिघडतो.

आंबट

केळी पचनास जड व आंबट प्रवृत्तीची असतात, तर दूध थंड आणि पचायला जड असते; हे दोन परस्परविरोधी गुणधर्म एकत्र आल्यास पचनक्रिया मंदावते.

जठराग्नी

या मिश्रणामुळे शरीरातील जठराग्नी मंदावतो, ज्यामुळे अन्न नीट पचत नाही.

विषारी घटक

नीट न पचलेल्या या अन्नामुळे शरीरात विषारी घटक म्हणजेच 'आम' तयार होऊ लागतात.

कफ

हे दोन घटक एकत्र आल्याने शरीरातील 'कफ' दोषात अचानक वाढ होते.

खोकला

कफ वाढल्यामुळे सर्दी, खोकला, छातीत कफ भरणे आणि सायनसचा त्रास सुरू होऊ शकतो.

रक्ताभिसरण

शरीरात साचणाऱ्या 'आम'मुळे रक्ताभिसरण आणि पेशींच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन त्वचारोग होण्याची शक्यता वाढते.

थकवा

हे मिश्रण एकत्र पोटात गेल्यावर जडपणा येतो, ज्यामुळे दिवसभर थकवा, सुस्ती आणि आळस जाणवतो.

बनाना शेक

नियमितपणे बनाना शेक किंवा शिकरण खाल्ल्याने पचनसंस्थेवर कायमस्वरूपी ताण येतो आणि आतड्यांचे आरोग्य बिघडते.

दूध आणि केळी

जर दोन्हीचे सेवन करायचेच असेल, तर दूध आणि केळी खाण्यामध्ये किमान २० ते ३० मिनिटांचे अंतर ठेवण्याचा सल्ला आयुर्वेद देतो.

मुघलांच्या प्रॉपर्टीचं इंग्रजांनी काय केलं?

<strong>येथे क्लिक करा</strong>