दूध भात खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

दूध भात

दूध भाताचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जाते. रोज दूध भात खाल्यास आरोग्यास कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.

Milk Rice Benefits | sakal

अपचनाचा त्रास

दूध आणि भात दोन्ही पचायला अत्यंत हलके असतात. त्यामुळे पचनसंस्थेवर कोणताही ताण येत नाही. ज्यांना पोटाचा किंवा अपचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

Milk Rice Benefits | sakal

कार्बोहायड्रेट्स

भातामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. थकल्यासारखे वाटत असेल किंवा ऊर्जा कमी झाली असेल, तर दूध भात खाणे फायदेशीर ठरू शकते.

Milk Rice Benefits | sakal

शांत झोप

दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे एक अमिनो ॲसिड असते, जे झोपेसाठी आवश्यक असलेल्या सेरोटोनिन आणि मेलाटोनिन या हार्मोन्सच्या निर्मितीला चालना देते. त्यामुळे रात्री दूध भात खाल्ल्यास शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.

Milk Rice Benefits | sakal

व्हिटॅमिन डी

दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असल्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. नियमितपणे दूध भात खाल्ल्याने हाडांच्या आरोग्याला फायदा होवू शकतो.

Milk Rice Benefits | sakal

नैसर्गिकरित्या थंडावा

उन्हाळ्यात किंवा शरीरात उष्णता वाढल्यास दूध भात खाणे फायदेशीर ठरते. हा आहार शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देण्यास मदत करतो.

Milk Rice Benefits | sakal

मासिक पाळी

काही स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी दूध भात खाण्याचा सल्ला दिला जातो. दुधातील पोषक घटक या वेदना कमी करण्यास मदत करतात.

Milk Rice Benefits | sakal

पोषक घटक

दुधामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड आणि इतर पोषक घटक त्वचेला तजेलदार बनवतात आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Milk Rice Benefits | sakal

पौष्टिक

अनेकदा ताप किंवा इतर आजारांमधून उठल्यावर शरीराला पुन्हा शक्ती देण्यासाठी दूध भात खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण तो पचायला सोपा आणि पौष्टिक असतो.

Milk Rice Benefits | sakal

डाळिंबाचे रोज सेवन करा आणि या आजारांना ठेवा दूर!

pomegranate benefits | Sakal
येथे क्लिक करा