सकाळ डिजिटल टीम
माईंड पॉवरने वस्तू हलवता येतात म्हणजे टेलिकिनेसिसचा एक दावा केला जातो, पण याबाबत कोणताही वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही.
मनाची एकाग्रता, ऊर्जा आणि विचारांची तीव्र शक्ती वस्तूंवर परिणाम करू शकते, असा लोकांचा समज आहे.
टेलिकिनेसिस म्हणजे मानवी मनाच्या जोरावर भौतिक वस्तूंना स्पर्श न करता त्या वस्तू हलवण्याच्या कथित क्षमतेसाठी वापरला जातो.
आजवर कोणत्याही प्रयोगात मनाच्या जोरावर वस्तू हलवल्याचा पुरावा मिळालेला नाही. जे दाखवलं जातं तो केवळ भ्रम असतो.
ज्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात त्यात बहुतेक वेळा ट्रिक, लपवलेली दोरी, चुंबक किंवा कॅमेऱ्याचा छुप्या पद्धतीने वापर केला जातो.
या प्रयोगामुळे मनाची एकाग्रता नक्कीच वाढवता येते, पण ती फक्त विचार आणि भावनांवर परिणामकारक ठरते, वस्तूंवर नव्हे.
मानसाच्या शरीरामध्ये बायो-इलेक्ट्रिक ऊर्जा असते, पण ती कोणतीही वस्तू हलवण्यासाठी पुरेशी नसते, हे विज्ञानाने स्पष्ट केले आहे.
काही संशोधकांनी अनेक वर्षे टेलिकिनेसिसवर प्रयोग केले, पण प्रत्येक वेळेस परिणाम "शून्य" राहिल्याचं सांगितलं जातं.
वस्तू हलवणे हे विज्ञानाच्या दृष्टीने अशक्य आहे, पण मनाची शक्ती वापरून तुम्ही स्वतःचे विचार, सवयी आणि उद्दिष्टे नक्की बदलू शकता.