संतोष कानडे
मनुष्याचा कुणीतरी निर्माता किंवा नियंत्रण करणारा सत्ताधीश आहे, असा सर्वत्र समज आहे.
याबाबत कुणीही कधीही ठोस पुरावा दिलेला नाही. स्वचिंतनातून लोक असे दावे करत असतात.
जगप्रसिद्ध दिवंगत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी देवाच्या अस्तित्वाबद्दल आपलं मत स्पष्टपणे मांडलेलं आहे.
ईश्वराचं अस्तित्व नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या जगाची निर्मितीदेखील कुणीही केलेली नाही, असं हॉकिंग सांगतात.
पृथ्वीवर किंवा या विश्वावर कुणाचीही सत्ता नाही, असंही त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे.
स्टीफन हॉकिंग यांचं १४ मार्च २०१९ रोजी निधन झालं, त्यानंतर त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं.
याच पुस्तकात त्यांनी देवाच्या नसण्याबद्दल दावा केला आहे. पुस्तकाचं नाव 'ब्रिफ आन्सर्स टू बिग क्वेश्चन्स' असं आहे.
या पुस्तकाची सध्या जगभरात चर्चा आहे. स्टीफन हॉकिंग यांचं संशोधन, विचारप्रणाली याकडे आदराने बघितलं जातं.