Monika Shinde
लहान घरात जागा वाढवण्यासाठी फर्निचर कमी ठेवा. उघडं लेआउट घराला मोकळेपणा देतं आणि जागा अधिक प्रशस्त दिसते.
भिंतींसाठी पांढरा, फिकट निळा किंवा बेज रंग वापरल्यास घर उजळ आणि मोठं वाटतं. प्रकाश परावर्तित होतो आणि शांतता निर्माण होते.
बेडखाली स्टोरेज, फोल्डिंग टेबल किंवा सोफा-बेड सारखं बहुपयोगी फर्निचर जागा वाचवतं आणि गरजेनुसार उपयोगी ठरतं.
भिंतींवर फ्लोटिंग शेल्फ, हॅंगिंग स्टोरेज यांचा वापर केल्यास जागा न भरता वस्तू नीट ठेवता येतात. सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा समतोल राखतो.
आरसे लहान खोली मोठी दिसण्यासाठी उपयुक्त ठरतात. योग्य ठिकाणी ठेवलेला आरसा प्रकाश परावर्तित करतो आणि खोलीला आकर्षक लुक देतो.
मिनिमलिस्ट डिझाइनमध्ये आवश्यक वस्तूंनाच स्थान असतं. अनावश्यक फर्निचर, शोपीस टाळा. घरात शांतता आणि नीटनेटकेपणा दिसतो.
घरात मोठ्या खिडक्या ठेवा, हलक्या पडद्यांचा वापर करा. नैसर्गिक प्रकाशामुळे घर प्रसन्न, मोकळं आणि ऊर्जायुक्त वाटतं.