Monika Shinde
उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी पुदिना आणि लिंबू पाणी हे एक उत्तम पर्याय आहे. यात असलेले पोषक घटक शरीराला आवश्यक असलेल्या अनेक फायदे देतात.
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण झपाट्याने कमी होतं. अशा वेळी दररोज लिंबूपाण्यात ताजं पुदिनं घालून प्यायल्यास शरीराला आवश्यक अशा हायड्रेशनसह थंडावा देखील मिळतो.
पुदिना आणि लिंबू पाणी पचनक्रिया सुधारते. हे पाणी पोटातील अॅसिडिटी कमी करून पाचन तंत्राला मदत करते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटदुखीची समस्या कमी होते
लिंबामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन C मुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते, तर पुदिना आणि लिंबू पाणी त्वचेतील हानिकारक द्रव्यांना बाहेर टाकून त्वचेला स्वच्छ आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत करते.
पुदिना आणि लिंबू पाणी वजन कमी करण्यास मदत करते. हे पाणी मेटाबोलिझम वाढवते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते.
एका ग्लास पाण्यात ताजे पुदिनाचे पान आणि लिंबाचा रस घाला. चवीनुसार सेंधो मीठ घालून पियू शकता.