Aarti Badade
जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची सवय असते. पण ही केवळ सवय आहे की शरीरातील एखादी कमतरता? रात्रीच्या वेळी होणारी ही तीव्र इच्छा नेमकी काय सुचवते?
after meal Causes of sweet cravings
Sakal
जेवणात 'रिफाईंड कार्ब्स' मैदा, पांढरा भात जास्त असतील, तर रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि अचानक घसरते. घसरलेली पातळी भरून काढण्यासाठी गोड पदार्थ खाल्ला जातो.
after meal Causes of sweet cravings
sakal
शरीरात मॅग्नेशियम, झिंक किंवा क्रोमियम यांसारख्या पोषक तत्वांची कमतरता असेल, तर मेंदूला सतत गोड खाण्याचे संकेत मिळतात. आहार संतुलित नसल्याचा हा एक मोठा इशारा असू शकतो.
after meal Causes of sweet cravings
Sakal
आपल्याला तहान लागलेली असते, पण आपल्याला ती भूक वाटते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास यकृत 'ग्लायकोजेन' सोडू शकत नाही, ज्यामुळे शरीर उर्जेसाठी साखरेची मागणी करते.
after meal Causes of sweet cravings
Sakal
कामामुळे शरीर खूप थकले असेल, तर झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी मेंदू गोड पदार्थांकडे वळतो. ताण-तणावामुळे 'कॉर्टिसोल' हार्मोन वाढते, जे साखरेची ओढ निर्माण करते.
after meal Causes of sweet cravings
sakal
गोड खाल्ल्यामुळे मेंदूत 'सेरोटोनिन' पाझरते. मनाला शांतता आणि आनंद मिळावा यासाठीही जेवणानंतर अनेकांना गोड खाण्याची तीव्र इच्छा होते.
after meal Causes of sweet cravings
Sakal
जेवणात प्रथिनांचे (Protein) प्रमाण वाढवा, पुरेसे पाणी प्या,जेवणानंतर गोड पदार्थांऐवजी बडीशेप किंवा गुळाचा छोटा खडा खा.
after meal Causes of sweet cravings
Sakal
जर ही इच्छा नियंत्रणाबाहेर जात असेल आणि तुमची साखरेची पातळी सतत बदलत असेल, तर हे मधुमेहाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
after meal Causes of sweet cravings
Sakal
High cholesterol symptoms
Sakal