Pranali Kodre
रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचे सामने सध्या खेळले जात आहेत.
या फेरीत कर्नाटकचा सामना हरियानाविरुद्ध बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे.
या सामन्यातून भारताचा स्टार खेळाडू केएल राहुलने कर्नाटककडून रणजीमध्ये पुनरागमन केले आहे.
मात्र, या सामन्यात पहिल्या डावात केएल राहुल २६ धावाच करू शकला.
दरम्यान, या सामन्यात केएल राहुलबरोबरच एका महिला खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले.
ही महिला खेळाडू म्हणजे २२ वर्षीय श्रेयंका पाटील.
मुळची बंगळुरूचीच असलेली श्रेयंका कर्नाटक विरुद्ध हरियाना यांच्यात होत असलेला रणजी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होती. तिचा फोटोही व्हायरल होत आहे.
श्रेयंकाने आत्तापर्यंत भारतीय महिला संघाकडून ३ वनडे आणि १६ टी२० सामने खेळले आहेत. तिने वनडेत ७ धावा केल्यात आणि ५ विकेट्स घेतल्या आहेत. तिने टी२०मध्ये २० विकेट्स घेतल्या आहेत.
ती वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळते.