Sandeep Shirguppe
सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून निवडूण आलेले आमदार गोपीचंद पडळकर कायम चर्चेत असतात.
मागच्या दोन दिवसांपासून गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाकयुद्धानंतर काल रात्री कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
मुळात या वादाची खरी ठिणगी आव्हाड यांनी पडळकरांना उद्देशून केलेल्या "मंगळसूत्र चोर" या वाक्यावरून पडली.
नेमकं पडळकरांना मंगळसूत्र चोर का? म्हणतात. १५ वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणाची आजही का चर्चा होते.
२००८ -०९ च्या सुमारास गोपीचंद पडळकरांनी जिल्हा परिषद मतदारसंघात गटाची उभारणी करताना विरोधकांमध्ये वादावादी झाली होती.
यावेळी एका लग्नसमारंभात गोपीचंद पडळकर उपस्थित असताना, विरोधकांशी त्यांची धक्काबुक्की झाली.
यावेळी काही महिलांनी मध्यस्थी केली. या घटनेवरून पडळकरांवर मारामारी, भांडणं यासोबत 'मंगळसूत्र चोरी' केल्याचा विरोधक आरोप करतात.
यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी या घटनेवर सविस्तर आरोपांचे खंडण केले. परंतु, विरोधक या मुद्दावरून त्यांना खिंडीत पकडतात.
यापूर्वी पडळकरांवर लोकसभा, विधानसभा यासह अनेक निवडणुकांच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर मंगळसूत्र चोर म्हणून टीका झाली आहे.