Mayur Ratnaparkhe
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत या विधिमंडळात झालेल्या राड्यावरून सरकारवर टीका केली आहे.
''महाराष्ट्राच्या विधानभवनात आज गँगवॉर झाले'', असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय.
''भारतीय जनता पक्षाने विधीमंडळात आणि त्यांच्या पक्षात गुंड टोळ्या आणल्या आहेत.'' असं राऊत म्हणत आहेत.
''देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उध्वस्त झाली आहे.'' अशी टीका केली आहे
''फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाली!'' असं मोठं विधानही केलंय.
''आज ज्याने विधानभवनात दंगल केली ते आमदार पडळकर टीम देवेंद्रचे सदस्य आहेत.'' असं मोठं विधान केलंय
''मोदी, शहा यांनी महाराष्ट्रात हे काय पेरले आहे?'' असा सवाल संजय राऊतांनी केलाय.
''अत्यंत वेदनादायी असे हे चित्र आहे! खरंच कुठे नेऊन ठेवलाय शिवरायांचा महाराष्ट्र?'' अशी टीका राऊतांनी केली आहे.