सकाळ डिजिटल टीम
तैवानची प्रसिद्ध मॉडेल काई युक्सिन हिचा वयाच्या ३०व्या वर्षी मृत्यू झाला. तिला निद्रानाशाचा त्रास होता. त्यावर उपचारावेळी तिचा मृत्यू झाला.
काई युक्सिन ही प्रसिद्ध डॉक्टर ज्यांना गॉडफादर ऑफ लिपोसक्शन यांच्याकडे उपचार घेत होती. तिला 'दुधाचं इंजेक्शन' दिलं होतं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
निद्रानाशाने त्रस्त असलेल्या काईला उपचाराचा भाग म्हणून एक इंजेक्शन देण्यात आलं. पण याचा उलट परिणाम होऊन तिला जीव गमवावा लागला.
वजन कमी करण्यासाठी लिपोसक्शन ही शस्त्रक्रिया आहे. याद्वारे शरीरावर असणारी अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते.
डॉक्टर वू शाओहू यांनी काईला इंजेक्शन दिलं आणि तिला गाढ झोप लागली. पण यानंतर ती झोपेतून जागीच झाली नाही.
काईला श्वासोच्छ्वासाचा त्रास झाल्यानंतर ती कोमात गेली. १८ दिवसानंतर तिचा व्हेंटिलेटर काढण्यात आला आणि काईची प्राणज्योत मालवली.
शस्त्रक्रियेआधी भूल देण्यासाठी वापरलं जाणारं प्रोपोफोल इंजेक्शन तिला दिलं होतं. दुधासारखा रंग दिसत असल्यानं याला दुधाचं इंजेक्शन असंही म्हटलं जातं.