तीन मुलांच्या वडिलांशी लग्न केल्यामुळे झाली बरबाद, मोहोब्बत्ते सिनेमातील 'ती' सध्या काय करते ?

kimaya narayan

मोहोब्बत्ते

2000 साली रिलीज झालेला अभिनेता शाहरुख खानचा मोहोब्बत्ते हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमातून एक चर्चेत राहिलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री किम शर्मा. गेली 14 वर्षं सिनेविश्वपासून दूर असलेली किम काय करते जाणून घेऊया.

किम शर्मा

मोहोब्बते सुपरहिट झाल्यानंतर किमने अनेक बॉलिवूड आणि साऊथ इंडियन सिनेमांमध्ये काम केलं. तिचा बोल्ड अंदाज अनेकांना भावला. मॉडेलिंग पासून सुरुवात करणाऱ्या किमने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावलं आणि अनेकजण तिचे फॅन झाले.

अयशस्वी करिअर

बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असूनही किमचे सिनेमे फ्लॉप ठरले. यामुळे 2011 नंतर तिने बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करणं सोडून दिलं. तिने बिझनेस करण्याचा निर्णय घेतला.

हॉस्पिटॅलिटी बिझनेस

2010 पासूनच किमने बिझनेस क्षेत्रात पाऊल ठेवलं. तिने साऊथ आफ्रिकेत काही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम केलं यावरून तिने यासंबधी करिअर करण्याचा निर्णय घेतला.

बिझनेस टायकूनशी लग्न आणि डिव्होर्स

2010 मध्ये किमने केनियामधील बिझनेस टायकून अली पुंजानी बरोबर लग्न केलं. लग्नापूर्वी अली पुंजानी यांचं आधी एक लग्न झालं होतं आणि त्यांना 3 मुलं होती. पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी किमशी लग्न केलं पण 2017 मध्ये ते विभक्त झाले.

नवऱ्याने दिवाळखोर बनवलं

काही रिपोर्ट्सनुसार, अली पुंजानीचं एक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर होतं. त्यामुळेच त्यांचा घटस्फोट झाला. असंही म्हटलं जातं कि नवऱ्याशी घटस्फोट झाल्यानंतर किम कर्जबाजारी झाली होती.

आता ती काय करते ?

किम आता बिझनेसवुमन आहे. ती ब्रायडल इमेज आणि कन्सल्टन्सी सेटअपची मालकीण आहे इतकंच नाही तर ITW Playworx कंपनीतची व्हाईस प्रेसिडेंट आहे.

'या' ठिकाणी पार पडलं शिवानी-अंबरचं लग्न - येथे क्लिक करा