IND vs PAK : 100 व्या सामन्यातच पाकिस्तानी फलंदाज खातात गटांगळ्या; लिस्ट आहे मोठी

अनिरुद्ध संकपाळ

पाकिस्तानी खेळाडूंसाठी त्यांचा 100 वा सामना हा फारसा फलदायी ठरत नाही. पाकिस्तानच्या अनेक फलंदाजांनी आपल्या 100 व्या सामन्यात सुमार कामगिरी केली आहे.

शोएब मलिकने आपला 100 वा सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळला होता. मात्र त्याला फक्त 13 धावा करता आल्या. पाकिस्तानचा 9 विकेट्सनी पराभव झाला.

बाबार आझमने आपल्या 100 व्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 13 धावा केल्या. पाकिस्तानने 4 विकेट्सनी सामना जिंकला.

मोहम्मद हाफिजने न्यूझीलंडविरूद्ध आपला 100 वा सामना खेळला अन् तो 9 धावा करून बाद झाला. पाकिस्तानने 88 धावांनी सामना जिंकला.

शादाब खानने इंग्लंडविरूद्ध आपला 100 वा टी 20 सामना खेळला. त्याने 3 षटकात 20 धावा दिल्या मात्र त्याला एकही विकेट घेतला आली नाही. पाकिस्तानने सामना 7 विकेट्सनी गमावला.

मोहम्मद रिझावनने भारताविरूद्ध 100 वा टी 20 सामना खेळला. त्यानं 31 धावा केल्या मात्र पाकिस्तानने सामना 6 धावांनी हरला.

हा तर गुन्हाच... टीम इंडियावर भडकला नवज्योत सिंग सिद्धू

Navjot Singh Sidhu | Sakal