IND vs PAK: हा तर गुन्हाच... टीम इंडियावर भडकला नवज्योतसिंग सिद्धू

प्रणाली कोद्रे

भारत विरुद्ध पाकिस्तान

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान संघात सामना झाला.

India vs Pakistan | X/TheRealPCB

न्युयॉर्कमध्ये सामना

न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला.

Rishabh Pant | X/BCCI

नाणेफेक

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

Rohit Sharma | X/ICC

टी20 मध्ये पहिल्यांदाच

मात्र, भारताचा संघ 19 षटकातच 119 धावांवर सर्वबाद झाला. टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानने भारताला पहिल्यांदाच सर्वबाद केले.

Pakistan | X/ICC

30 धावांत 7 विकेट्स

या सामन्यात भारतीय संघ एका क्षणी 11 षटकात 3 बाद 89 अशा चांगल्या स्थितीत होता. मात्र, त्यानंतर अवघ्या 8 षटकात भारताने 30 धावा अधिक जोडताना तब्बल 7 विकेट्स गमावल्या.

Shivam Dube | Sakal

नवज्योतसिंग सिद्धू भडकला

त्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू भडकला होता.

Navjot Singh Sidhu | Sakal

हा एक गुन्हाच...

समालोचन करताना सिद्धू म्हणाला, 89 धावांवर तीन बाद वरून 119 धावांवर भारतीय संघ ऑल आऊट. हा एक गुन्हाच आहे. टी20 मध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताला ऑल आऊट केले.

Virat Kohli - Rohit Sharma | X/BCCI

बुमराह-संजनाची प्रसिद्ध FRIENDS च्या सेटला भेट

Jasprit Bumrah Sanjana Ganesan | Instagram