Pranali Kodre
१४ जुलै रोजी लॉर्ड्स मैदानाच भारतीय संघाला इंग्लंडने कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात शेवटच्या सत्रात २२ धावांनी पराभवाचा धक्का दिला.
यामुळे अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने तीन सामन्यांनंतर २-१ अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांनी पहिल्या डावात प्रत्येकी ३८७ धावा केल्याने कोणालाही आघाडी घेता आली नव्हती. पण दुसऱ्या डावात इंग्लंडने १९२ धावा करत भारताला १९३ धावाचे आव्हान दिले. पण भारताचा संघ १७० धावांवर सर्वबाद झाला.
१९३ धावांचा पाठलाग करताना ११२ धावांवर ८ विकेट्स गमावल्यानंतरही रवींद्र जडेजाने अर्धशतक करत आधी जसप्रीत बुमराहसोबत आणि नंतर मोहम्मद सिराजसोबत जवळपास तीन तास किल्ला लढवला होता.
जडेजाने बुमराहसोबत १३५ चेंडूत ३५ धावांची भागीदारी केली, जर सिराजसोबत ८० चेंडूत २३ धावांची भागीदारी केली होती. मात्र ७५ व्या षटकात सिराज बशीरने टाकलेला चेंडू क्रिजमध्ये पडल्यानंतर गोल फिरत स्टंपवर लागल्याने दुर्दैवीरिक्या बाद झाला.
सिराजची विकेट भारताची शेवटची विकेट होती. त्यामुळे सिराज आणि जडेजा अत्यंत निराश झाले होते. सिराजच्या डोळ्यात अश्रुही तरळले होते.
या पराभवावर आता सिराज सोशल मिडियावर पोस्ट करून व्यक्त झाला आहे.
सिराजने या सामन्यातील काही फोटो शेअर करताना लिहिले की 'काही सामने त्यांच्या निकालामुळे नाही, तर त्या सामन्याने तुम्हाला काय शिकवलंय, यामुळे तुमच्या नेहमीच आठवणीत राहतात.'