Pranali Kodre
क्रिकेटपटूंनी अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती घेणे, ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. यापूर्वी काही क्रिकेटपटूंनी मानसिक स्वस्थ्यासाठी असा निर्णय घेतला आहे.
यात आता न्यूझीलंडची कर्णधार आणि महिला अष्टपैलू सोफी डिवाईन हिचाही समावेश झाला आहे.
सोफीने सांगितेल आहे की तिला तिच्या स्वत:कडे लक्ष देण्याला प्राधान्य देण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे.
त्यामुळे आता तिने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली असून ती उर्वरित देशांतर्गत क्रिकेट हंगाम खेळणार नाही.
ती फेब्रुवारीमध्ये सुरू होणारा वूमन्स प्रीमियर लीग (WPL) स्पर्धाही न खेळण्याची दाट शक्यता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तिला WPL 2025 साठी रिटेन केले होते.
परंतु, न्यूझीलंड क्रिकेटकडून मिळालेल्या माहितीनुसार आता सोफीच्या विश्रांतीच्या निर्णयाला आरसीबीकडून समर्थन मिळाले आहे.
ती WPL 2024 विजेत्या आरसीबी संघाचा भाग होती. या हंगामात तिने १३६ धावा केल्या होत्या आणि ६ विकेट्स घेतल्या होत्या.