सकाळ डिजिटल टीम
हैद्राबादमधील जुबीली, फिल्म नगर येथे नव्या घरी सिराज आपल्या कुटुंबासह राहतो.
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या हैद्राबादमधील आलिशान घराची किंमत तब्बल १३ कोटी रूपये इतकी आहे.
नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला गुजरात टायटन्सने १२ कोटी २५ लाख रूपयांत करारबद्ध केले.
आयपीएलमध्ये मागची ७ वर्ष मोहम्मद सिराजने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाचे प्रतिनिधित्व केले.
सिराजने घर घेतल्यानंतर दिग्गज खेळाडू व सहकारी विराट कोहलीला पार्टीसाठी घरी आमंत्रित केले होते.
आरसीबी संघामधील सहकाऱ्यांनीही सिराजच्या घरी भेट दिली होती.
आरसीबीचा माजी कर्णधार फाफ ड्यूप्लेसीसनेही सिराजच्या नव्या घराला भेट दिली.
सिराजने हॉलमध्ये आजपर्यंत मिळालेल्या सर्व ट्रॉफीज प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत.