संतोष कानडे
मुंगसाला भारतीय लोकपरंपरेत धैर्य आणि संकटावर मात करण्याचे प्रतीक मानले जाते.
मुंगूस किंवा त्याचे पिल्लू दिसणे काही लोक शुभ संकेत मानतात. सोशल मीडियात तसे मेसेज व्हायरल होत आहेत.
विशेषतः मुंगसाचे पिल्लू दिसल्याने घरात सुख-समृद्धी येते, अशी लोकश्रद्धा काही भागांत आढळते.
काहीजण पिल्लाचे तोंड पाहिल्यास दिवस चांगला जातो, असे मानतात.
मुंगूस सापाशी लढतो म्हणून त्याला वाईट शक्तींवर विजयाचे प्रतीकही मानले जाते.
मात्र पिल्लाचे तोंड पाहिल्याने धन, आरोग्य किंवा नशीब वाढते, याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
मुंगसाचे पिल्लू दिसणे ही नैसर्गिक घटना आहे; त्याचा भविष्यातील घटनांशी थेट संबंध सिद्ध झालेला नाही.
पिल्लाला हात लावणे किंवा पकडणे टाळावे, कारण वन्य प्राणी घाबरल्यास चावू शकतो.
मुंगसाचे पिल्लू एकटे दिसल्यास त्याची आई आसपास असण्याची शक्यता असते.
त्यामुळे मुंगसाचे पिल्लू दिसणे शुभ मानायचे की नाही, हा श्रद्धेचा विषय आहे; त्याला वैज्ञानिक फायदा मानता येत नाही.