संतोष कानडे
मुघलांनी ठेवलेल्या कनीज स्त्रीयांना बादशहाच्या किंवा राजघराण्यातील पुरुषांच्या लैंगिक सोबतीच्या भूमिकेतही ठेवले जात असे.
एखादी कनीज बादशहाच्या विशेष पसंतीस उतरल्यास तिला अधिक चांगले कपडे, दागिने, आर्थिक बक्षिसे किंवा महालात उच्च दर्जा मिळू शकत असे.
कनीज स्त्रीयांना महालातील स्वच्छता, सजावट आणि दैनंदिन व्यवस्थेची कामे करावी लागत.
बेगम किंवा शाही महिलांची वैयक्तिक सेवा करणे हे त्यांचे महत्त्वाचे काम असे.
कपडे, दागिने, अत्तर, प्रसाधने आणि इतर वस्तूंची व्यवस्था त्या स्त्रीया करत.
काही कनीजना संगीत, नृत्य, गायन किंवा काव्य यांचे प्रशिक्षण दिले जात असे आणि दरबारातील मनोरंजनात त्यांचा सहभाग असे.
बादशहाच्या वैयक्तिक सेवेसाठी नियुक्त असलेल्या कनीजना त्याच्या खोलीतील व्यवस्था, कपडे, अत्तर किंवा इतर दैनंदिन गरजांची काळजी घ्यावी लागे.
काही कनीज संदेश पोहोचवणे, पाहुण्यांची सेवा करणे किंवा महालातील विशिष्ट कामांची देखरेख करणे अशी कामेही करत.
उच्च दर्जाच्या कनीजना शाही महिलांच्या जवळ राहण्याची आणि महालातील महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असण्याची संधी मिळत असे.
मुघल हरम ही केवळ लैंगिक संबंधांसाठीची जागा नसून शेकडो महिलांचे निवासस्थान, सेवा-व्यवस्था आणि राजकीय-सामाजिक जीवनाचे स्वतंत्र जग होते.