सकाळ डिजिटल टीम
मुंगूस केवळ एक प्राणी नसून तो साक्षात देवतेचे वहान म्हणून ओळखला जातो.
मुंगूस कोणत्या देवतेचे वाहन आहे आणि तो दिसणे शुभ का मानले जाते जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्र आणि लोकमान्यतेनुसार, मुंगूस दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक संस्कृतींमध्ये याला चांगल्या नशिबाचे आणि धनलाभाचे प्रतीक मानले जाते.
हिंदू धर्मानुसार, मुंगूस हे धनाची देवता कुबेर यांचे वाहन मानले जाते. त्यामुळे मुंगूस दिसणे हे साक्षात कुबेराचे दर्शन झाल्यासारखे असते आणि ते आर्थिक भरभराटीचे संकेत देते असे मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार मुंगूस हे सूर्याचे प्रतीक आहे. सूर्य जसा जीवनात प्रकाश आणतो, त्याचप्रमाणे मुंगूस दिसणे जीवनात यश, समृद्धी आणि चांगल्या वेळेचे आगमन दर्शवते. अशी मान्यता आहे.
सकाळी लवकर मुंगूस दिसल्यास त्या व्यक्तीला लवकरच धनलाभ होतो आणि त्याचा दिवस चांगला जातो अशी मान्यता आहे. तसेच, येत्या सात दिवसांत धनाशी संबंधित एखादी शुभ वार्ता मिळण्याची शक्यता असते असेही काही ठिकाणी म्हटले जाते.
जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडले असाल आणि तुम्हाला मुंगूस दिसला, तर तुमचे ते काम यशस्वी होणार असल्याचे संकेत मानले जातात. विशेषतः कोर्टासंबंधी कामांसाठी जाताना मुंगूस दिसणे यशदायी मानले जाते.
मुंगूस हा सापांसारख्या विषारी प्राण्यांचा नैसर्गिक शत्रू आहे. त्यामुळे मुंगूस दिसणे हे तुमच्या जीवनातील नकारात्मक शक्ती किंवा अडचणींचा नाश झाल्याचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. अशी ही श्रद्धा आहे.
मुंगूस दिसणे हे बहुतेकवेळा सकारात्मक आणि शुभ फल देणारे मानले जाते. अर्थात, या सर्व ज्योतिषशास्त्रीय मान्यता आहेत आणि त्या व्यक्तीच्या श्रद्धेवर अवलंबून असतात.