Yashwant Kshirsagar
अनेकदा स्वप्नात माकड दिसते. हे भविष्यात घडणाऱ्या घटनांचा संकेत देत असते, जाणून घेऊया माकड स्वप्नात दिसण्याचा अर्थ काय होतो.
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात माकड दिसणे शुभ मानले जाते. तुम्ही नवीन गोष्ट शिकणे किंवा नवीन पाऊल उचलण्याचे संकेत असतो.
माकड स्वप्नात दिसणे म्हणजे तुमच्यावर हनुमानाची कृपा आहे असा संकेत मिळतो. तसेच जीवनात अनेक बदल होणार असल्याचाही संकेत आहे.
स्वप्नात माकडाने पाठलाग करताना दिसणे म्हणजे जीवनात एखादी मोठी समस्या निर्माण होण्याचा संकेत असतो. त्यामुळे तुम्ही सतर्क व्हायला हवे.
स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात अनेक माकडे दिसणे शुभ मानले जाते. हा आर्थिक लाभाचा संकेत आहे.
स्वप्नात माकडे खेळताना दिसणे हा तुमच्या जीवनात सुख समाधान येण्याचा संकेत आहे.
स्वप्नात मेलेले माकड किंवा रागाने लालबुंद माकड पाहणे हे भविष्यातील मोठ्या संकटाचा संकेत असतो.