Monika Shinde
राज्यात सध्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे.
अशा परिस्थितीत सर्दी-खोकल्याचा त्रास होणे हे सामान्य आहे.
त्यामुळे अनेक जण दिवसातून दोन ते तीन वेळा चहा घेतात. पण जर तुम्ही चहामध्ये हे तीन घटक टाकले, तर तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.
आले हे सर्दी, खोकला आणि घशाच्या खवखवीसाठी रामबाण उपाय आहे. चहा उकळताना त्यात आल्याचा १ इंचाचा तुकडा टाका.
दालचिनी हे एक सुगंधी आणि औषधी गुणधर्म असलेले मसाल्याचे घटक आहे, जे पावसाळ्यातील सर्दी-खोकला आणि थंडीच्या त्रासांवर रामबाण उपाय ठरू शकते.
तुळस म्हणजे नैसर्गिक अँटीबायोटिक. २-३ ताजी पाने चहात टाकल्यास सर्दी लगेच बरी होते.