पावसाळ्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी हे 5 पदार्थ जास्त खा

Yashwant Kshirsagar

पोषक तत्व

‘व्हिटॅमिन डी’ शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते आणि हाडे मजबूत करण्याचे काम करते.

Vitamin D Rich Foods | esakal

सूर्यप्रकाश

सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणे देखील व्हिटॅमिन डी मिळवण्याचा एक चांगला मार्ग आहे, परंतु पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो, त्यामुळे आहारात व्हिटॅमिन डी जास्त असलेले पदार्थ घेणे आवश्यक आहे.

Vitamin D Rich Foods | esakal

कमतरता

चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यात व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी कोणते 5 पदार्थ खाल्ले पाहिजेत.

Vitamin D Rich Foods | esakal

फॅटी मासे

आहारात फॅटी माशांचा समावेश डी जीवनसत्व तर मिळतेच पण ओमेगा-3 फॅटी ॲसिड देखील प्रदान करते, जे तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहे.

Vitamin D Rich Foods | esakal

अंडी

अंड्यातील पिवळ बलक मध्ये देखील व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात आढळते. तुम्ही त्याचा आहारात अनेक प्रकारे समावेश करू शकता. तुम्ही अंडी उकडलेले, तळलेले किंवा ऑम्लेट स्वरूपात खाऊ शकता.

Vitamin D Rich Foods | esakal

दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्येही व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. आहारात त्यांचा समावेश केल्याने व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करण्यास मदत होईल. यामुळे हाडे मजबूत होतील.

Vitamin D Rich Foods | esakal

मशरूम

मशरूम देखील व्हिटॅमिन डीचा उत्कृष्ट स्रोत आहे. यात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी असते. त्यामुळे मशरूमचा आहारात समावेश करून व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करता येऊ शकते.

Vitamin D Rich Foods | esakal

फोर्टिफाइड दूध

फोर्टिफाइड दूध आणि दही व्हिटॅमिन डीने समृद्ध केलेले असतात, ज्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करता येते.

Vitamin D Rich Foods | esakal

पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'ही' ५ फळे, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Fruits To Avoid in Monsoon | esakal
येथे क्लिक करा