Yashwant Kshirsagar
पावसाळ्यात वातावरण बदलते तसं शरीर पण हा बदल स्वीकारते.
यावेळी जर तुम्ही चुकीचे फळ खाल्ले तर आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो.
काही फळे खाल्ल्याने डिहायड्रेशन, उलटी, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
पावसाळ्यात द्राक्षे खाण्यामुळे पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे हे फळ खाणे टाळावे.
टरबूज ओलावा शोषते त्यामुळे ते लवकर सडते, यामुळे हे फळ पावसाळ्यात खाणे योग्य नाही.
काकडीमध्ये खूप पाणी असते पण पावसाळ्यात हे फळ खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते.
चेरीची साल नाजूक असते त्यामुळे पावसाळ्यात लगेच बुरशी लागू शकते. यामुळे हे खाणे टाळावे.
खरबूज देखील पाणीदार फळ आहे त्यामुळे हे खाल्ल्याने डिहायड्र्रेशन आणि पोटाची समस्या होऊ शकते.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही. कोणतीही कृती अमंलात आणण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.