पावसाळ्यात जोडीदाराबरोबर फिरायला जाताय? सातपुड्याच्या 'या' थंड हवेच्या ठिकाणी नक्की जा...

Shubham Banubakode

तोरणमाळ

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले तोरणमाळ हे हिल स्टेशन निसर्गप्रेमी, श्रद्धाळू आणि साहसवीरांसाठी एक स्वर्ग आहे.

Toranmal Hill Station Travel Guide | esakal

यशवंत तलाव

हिरव्यागार जंगलांनी वेढलेले हे तलाव बोटिंगसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथे स्थलांतरित पक्षीही पाहायला मिळतात.

Toranmal Hill Station Travel Guide | esakal

सीता खणी

रामायणाशी जोडलेले हे स्थळ प्राचीन गुहांनी, खडकांच्या रचनांनी आणि अप्रतिम दृश्यांनी भरलेले आहे.

Toranmal Hill Station Travel Guide | esakal

खडकी पॉइंट

सातपुड्याचे विहंगम दृश्य आणि थंड वाऱ्याची झुळूक... हे ठिकाण फोटोसाठी आणि आत्मशांतीसाठी एकदम योग्य आहे!

Toranmal Hill Station Travel Guide | esakal

कमळ तलाव

शांत पाण्यावर बहरलेली कमळं आणि निळ्या आकाशाचं प्रतिबिंब निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच

Toranmal Hill Station Travel Guide | esakal

गोरखनाथ मंदिर

महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक जमतात. डोंगरांवर वसलेले हे मंदिर ध्यानासाठी परिपूर्ण जागा आहे.

Toranmal Hill Station Travel Guide | esakal

मच्छिंद्रनाथ गुंफा

नाथ संप्रदायाशी निगडीत ही गुंफा निसर्गाच्या कुशीत ध्यानसाधनेसाठी अतिशय शांत जागा आहे.

Toranmal Hill Station Travel Guide | esakal

सातपुडा व्ह्यू पॉइंट

सूर्योदय-सूर्यास्ताचा मोहक अनुभव आणि ट्रेकिंगसाठी सुंदर ट्रेल्स साहसप्रेमींसाठी आदर्श ठिकाण आहे.

Toranmal Hill Station Travel Guide | esakal

नागार्जुन पॉइंट

डोंगररांगा, दऱ्यांचे विहंगम नजारे आणि निसर्गाची शांतता यांचा अनुभव घ्यायचा असेल, तर इथे नक्की भेट द्या.

Toranmal Hill Station Travel Guide | esakal

पावसाळा सुरु होताच पर्यंटकांना खुणावतोय चिखलदरा, कसं आहे विदर्भाचं नंदनवन?

chikhaldara hill station tour guide | esakal
हेही वाचा -