पावसाळ्यात बेलपत्र खाण्याचे चमत्कारिक फायदे

Shubham Banubakode

श्रद्धेचं प्रतीक

महादेवाला अर्पण केलं जाणारं बेलपत्र फक्त श्रद्धेचं प्रतीक नाही, तर आयुर्वेदात त्याला अनन्यसाधारण महत्त्वं आहे.

रोगप्रतिकारशक्ती

पावसाळ्यात सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशावेळी बेलपत्र रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करू शकते.

पचनक्रिया

पावसाळ्यात अपचन, गॅस, पोट फुगणे अशा तक्रारी वाढतात. बेलपत्र पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

मधुमेह

बेलपत्रामधील काही नैसर्गिक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात.

गुणधर्म

बेलपत्रात अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात. त्यामुळे शरीरातील सूज कमी करण्यास आणि संसर्गाशी लढण्यास मदत होऊ शकते.

बेलपत्र कसे खावे?

सकाळी रिकाम्या पोटी १ ते २ ताजे बेलपत्र स्वच्छ धुऊन चावून खाऊ शकता. तसेच बेलपत्राचा काढा किंवा पावडरचाही वापर केला जातो.

बेलपत्राचा काढा

५ बेलपत्र बारीक करून एका ग्लास पाण्यात उकळा. पाणी अर्धे झाल्यावर गाळून घ्या. थंड झाल्यानंतर त्याचे सेवन करता येते.

तज्ज्ञांचा सल्ला

बेलपत्र फायदेशीर असलं तरी अति सेवन टाळा. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता आणि नियमित औषधे घेणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करावे.

सिंधू संस्कृतीतील लोक कसे राहत होते?

How People Lived in the Indus Valley Civilization

|

esakal

हेही वाचा -